Ad will apear here
Next
‘एमसीई’ सोसायटीतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा


पुणे : आझम कँपस येथील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आझम कॅंपसच्या व्ही. एम. गनी स्पोर्ट्स पॅव्हेलिअनच्या क्रीडागंणावर सकाळी निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी भूषविले. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांतून भारताच्या सर्व राज्यांतील संस्कृतीचे सादरीकरण केले. आझम कॅंपस परिवारातील सर्व संस्था, ट्रस्टचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक यांसह २५ हजार विद्यार्थी उपस्थित होते.



एनसीसी पथक, अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, स्कॉलर बॅच, पै पब्लिक स्कूल, आझम उर्दू स्कूल, पै परवाझ, गोल्डन ज्युबिली, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा, तैय्यबिय्या अनाथालय, स्कूल ऑफ आर्ट आणि आझम स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली.

स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अॅकॅडमीच्या ११व्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक दाखवले. हेमा जैन, भरत लोंढे यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रोशन आरा, प्रा. मजिद सय्यद व प्रा. दिलशाद सय्यद यांनी केले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZHPBW
Similar Posts
‘स्कूल ऑफ आर्ट’च्या ‘आर्ट वॉक’ला चांगला प्रतिसाद पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अॅकॅडमीतर्फे आयोजित ‘आर्ट वॉक’ आणि ‘आर्ट एक्झिबिशन’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. २६ आणि २७ जानेवारी २०१९ रोजी हे प्रदर्शन आझम कॅंपस येथे भरविण्यात आले होते.
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते
आझम कॅम्पसमध्ये २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटी येथे शुक्रवार, २१ जून २०१९ रोजी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनी आझम कँपसमध्ये कार्यक्रम पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कँपसमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language